नवरदेवांसाठी उखाणे.


रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित
मागतो आयु्ष्य ----- च्या सहीत
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो .........बोट नको चाउस
काही शब्द येतात ओठातून
काही येतात गळ्यातून
….चं नाव येतं मात्र थेट हृदयातून
वड्यात वडा बटाटावडा,
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.
माझ्या जीवनरुपी अंगणात काढल्या रांगोळीच्या सुबक रेषा.
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा